breaking-newsपिंपरी / चिंचवड

कमलनयन बजाज शाळेतील विद्यार्थ्यांची नोएडा येथील बास्केट बॉल प्रशिक्षणासाठी निवड

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

प्रितिश जितेश कोकाटे, या संभाजीनगर, चिंचवड येथील कमलनयन बजाज शाळेतील विद्यार्थ्यांची नॅशनल बास्केट बॉल असोसिएशन, नोएडा, उत्तर प्रदेश येथे बास्केट बॉलच्या पुढील प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. त्यांचा उपमहापौर तुषार हिंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे, पर्यवेक्षक डी. एम. भिसे, अनिता केदारी, राजू कोतवाल, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, पिंपरी चिंचवड शारीरीक संघटनेचे कार्याध्यक्ष रफीक इनामदार, जितेश कोकाटे हे उपस्थित होते. प्रितिश यांना देशातील तसेच परदेशातील बास्केट बॉल क्रिडा तज्ञांकडून नोएडा येथे उच्च प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button