breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

कतरिना कैफच्या धाकट्या बहिणीची बॉलिवूडमध्ये एंट्री

मुंबई – बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या धाकट्या बहिणीची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली आहे. इसाबेल कैफ ही आगामी ‘सुस्वागतम खुशामदीद’ या चित्रपटात अभिनेता पुलकित सम्राटसोबत झळकणार आहे. या जोडीने नुकतंच ‘बन पिया’ नावाचं दांडिया गाणं शूट केलं आहे.

https://www.instagram.com/p/CKS4RoHBEFF/?utm_source=ig_embed

या चित्रपटात पुलकित दिल्लीच्या एका मुलाच्या भूमिकेत आहे. तर इसाबेल आगरा येथील नूरची भूमिका साकारणार आहे. याबाबत पुलकित म्हणाला, ‘आमची केमिस्ट्री खूपच धमाकेदार आहे. आमची जोडी खूपच छान दिसते असे सेटवरील लोक म्हणतात.’ तसेच इसाबेल खूपच एनर्जीने काम करते. सेटवर तिच्यामुळे खूपच एनर्जी येत असून ती खूप मेहनती आहे. आपल्या भूमिकेसाठी तिने खूपच मेहनत घेतली असून मला प्रभावित केल्याचेदेखील पुलकितने म्हटले.

दरम्यान, ‘सुस्वागतम खुशामदीद’चे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरू आहे. हा एक रोमँटिक धाटणीचा चित्रपट असून यातून सामाजिक संदेशही देण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. धीरज कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर इनसाइट इंडिया आणि एंडमोल शाइन इंडियाने यलो आंट प्रॉडक्शन्स अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button