breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे शहरातील सांडपाण्याची होणार कोरोना चाचणी- महापौर मोहोळ

पुणे – कोरोना विरोधी लढ्यात पुणे महानगर पालिका विविध उपाययोजना राबवत असून महापालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या उपाय योजना मुळे रुग्ण संख्या देखील कमी होताना दिसत आहे. कोरोना नियंत्रण साठी पुणे पालिका कडून आता सांडपाण्याची तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या सांडपाण्याचे नमुने घेण्यात येणार आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी ,’ मैला पाणी शुद्धीकरण केंद्रामध्ये निरनिराळ्या भागातून जमा होणाऱ्या सांडपाण्याचे एनसीएल ने नमुने घेऊन त्याचे परीक्षण केल्यानंतर त्या सांडपाण्यामध्ये किती प्रमाणात कोरोनाचे विषाणू आढळून येतात ,त्याचे विश्लेषण तपासणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळेमार्फत करण्यात आली आहे .या विश्लेषण तपासणी मुळे कोणत्या भागामध्ये कोरोना विषाणू चे प्रमाण किती आहे .याची माहिती त्वरित कळणार आहे ,त्या अनुषंगाने कोरोना विषाणू नियंत्रणाच्या उपायोजना करण्यासाठी त्याचा फायदा होईल. अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी दिली.

याशिवाय कोरोना विषाणू नियंत्रण उपाययोजनांच्या अनुषंगाने एनसीएल मार्फत होणाऱ्या सादरीकरणासाठी गुरुवार (दि १७ जून २०२१) रोजी सकाळी ११.०० वाजता महापौर कार्यालय पुणे महानगरपालिका येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button