breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर तालुक्यातील भाजपाच्या २५७ बुथप्रमुखांचे सामूहिक राजीनामे

श्रीरामपूर – एकीकडे भाजपा विरोधात महाविकास आघाडी लढाई लढत असताना दुसरीकडे मात्र अहमदनगर उत्तर जिल्हा भाजपा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भाजपाच्या ३१० बुथप्रमुखांपैकी २५७ बुथप्रमुखांसह सदस्यांनी आपल्या पदाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील सदस्यांनी राजीनामा देऊन संचालन समिती स्थापन करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

राज्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत काल श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर मनमानी कारभार करत असून पक्षाची ध्येयधोरणे न राबवता मनमानी कारभार करत असल्याचा यावेळी निषेध करण्यात आला. श्रीरामपूर शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात काल सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली, यावेळी सर्वानुमते पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यावेळी भाजपा संचालन समितीची स्थापना करण्यात आली असून जिल्हाध्यक्षाचा कोणताही निर्णय ही समिती मान्य करणार नाही.

राम शिंदे व राधाकृष्ण विखे पाटील एकच पक्षात असले तरी एकमेकांना शह देत असल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. त्यातच उत्तर नगर जिल्ह्यात विखेंचे पारडे जड असून यावेळी मात्र राम शिंदे यांनी आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना पद वाटल्याने अस्वस्थता निर्माण झाली असून आता पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button