breaking-newsआंतरराष्टीय

कझाकिस्तानमध्ये 100 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

नवी दिल्ली | महाईन्यूज

बेक एअरलाईन्सचे 100 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान दुमजली इमारतीवर कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये 9 जण जागीच ठार झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कझाकिस्तानच्या अल्मटी विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले होते. मात्र, त्यानंतर काही क्षणांतच हे विमान नागरी वस्तीवर कोसळले आहे. या विमानामध्ये 95 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर होते. कझाकिस्तानच्या मंत्रालयाने सांगीतले की विमानाने उंची गमावली आणि सकाळी 7.22 वाजता सिमेंटच्या संरक्षण भिंत आणि दुमजली इमारतीवर कोसळले आहे.

हे विमान अल्मटीहून नूरसुल्तानला जात होते व हे विमान तलगार भागात कोसळले असून हा भाग विमानतळाला लागूनच आहे. अपघातानंतर काही वेळातच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button