breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

रजनीकांत यांच्या दरबार चित्रपटाच्या पोस्टरला चाहत्यांकडून चक्क दुग्धाभिषेक…

देशभरात रजनीकांत यांचे लाखो चाहते आहेत.रजनीकांत हे त्यांच्या चाहत्यांसाठी देवापेक्षा कमी नाहीयेत… रजनीकांत यांचा चित्रपट त्यांच्यासाठी उत्सवासारखा असतो. अशातच त्यांचा दरबार हा चित्रपट आज म्हणजे 9 जानेवारी 2020ला प्रदर्शित झाला. मुंबईतील सायन परिसरात असलेल्या एका चित्रपटगृहात रजनीकांत यांच्या चाहत्यांनी जल्लोष करत दरबार चित्रपटाच्या पोस्टरला चक्क दुग्धाभिषेक केला.

रजनीकांत यांनी वयाची सत्तरी गाठली आहे. या निमित्तानं दरबार या चित्रपटाचा ७० फुटी पोस्टर तयार करण्यात आलं आहे. या पोस्टरला दुग्धाभिषेक करत चाहत्यांनी जल्लोश केला. काही ठिकाणी तर चित्रपट सुरू होताच चित्रपटगृहांमध्ये चाहत्यांनी आनंद व्यक्त केल्याचं पहायला मिळालं.

दरबार’ या चित्रपटात रजनीकांत पोलिसाची भूमिका साकारत आहेत. ‘दरबार’ चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबतच नयनतारा, प्रतीक बब्बर, सुनील शेट्टी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट तामिळ, तेलुगू, हिंदी आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button