breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कंत्राटी कामगारांचा विविध मागण्यासाठी महापालिकेवर मोर्चा

पिंपरी –  विविध मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांनी पिंपरी-चिंचवड महापालिका भवनावर धडक मोर्चा काढून घोषणबाजी केली. पालिका प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडून मागणी करण्यात आली. कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

पिंपरी येथील महात्मा फुले पुतळ्यापासून मोर्चास सुरुवात झाली. महापालिका भवनापर्यंत घोषणाबाजी करुन मोर्चा काढण्यात आला. कंत्राटी कामगार, कष्टकरी साफसफाई कामगार महिलांना महानगरपालिका सेवेत कायम करा, ईएसआय आणि फंड द्या. त्याचप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेत घरकुल मिळावे. ते करीत असलेल्या कामाच्या मोबदल्यात किमान आणि समान वेतन मिळावे तसेच,  विविध मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांना जागे करण्यासाठी कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने महापालिका भवनासमोर मोर्चा काढण्यात आला.साफसफाई कामगार महिला मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. कंत्राटी कामगारांना कायम करा ‘समान काम समान वेतन’ अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, सरचिटणीस धर्मराज जगताप, भीमाशंकर शिंदे, वंदना साळवे, माया कांबळे, वंदना सोनवणे, सविता लोंढे, मंगल जाधव, सरला अहिर उपस्थित होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button