breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘ई-गव्हर्नन्स’च्या दुसर्‍या टप्प्यास प्रारंभ करणार

पिंपरी –  सामाजिक मूल्य जोपासत प्रशासकीय कामकाज करीत असताना नागरिकांना उत्तम व तत्पर सेवा देणे म्हणजेच सुशासन आहे. ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून सुशासनापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका पुढील सहा महिन्यांच्या काळात ई-गव्हर्नन्सच्या दुसर्‍या टप्याला प्रारंभ करणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. 

राज्य शासनाच्या सूचनेनुसार पालिकेच्या कामगार कल्याण विभागाच्या वतीने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जयंती सुशासन दिवस साजरा केला जातो. चिंचवडच्या ऑटो क्‍लस्टर सभागृह येथे सुशासन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त पालिका अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.

या वेळी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, प्रभारी सहायक आयुक्त अण्णा बोदडे, शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे, पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुक्त हर्डीकर म्हणाले की, गुड गव्हर्नन्सचा प्रारंभ अमेरिकेत झाला. कार्यक्षमता, सचोटी आणि पारदर्शकता ही सुशासनाची 3 महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. नागरिकांना प्रशासनामार्फत सेवा देताना सामाजिक मूल्यांचे जतन करून सेवा देण्याचा सुशासनाचा उद्देश आहे. शासनाकडे ‘डीजी लॉकर’ची सुविधा उपलब्ध आहे. पालिकेच्या विविध विभागांकडे येणार्‍या अर्जांची ‘डिजिटल’ यादी विभागांनी करावी. प्रत्येक विभागाने गतिमानतेने व मूल्याधिष्टित काम करावे. यशदाचे व्याख्याते विठ्ठल दीक्षित यांनी सार्वजनिक प्राधिकरणाकडून अधिकृत करण्यात आलेल्या सेवा, अधिसूचित करण्यात आलेल्या सेवा व सेवा हक्क नियम कालमर्यादेतील सेवा, द्यावयाची हमी, अपिलाच्या तरतुदी आणि अधिनियमांतर्गत येत असलेल्या दंड याबाबतची सविस्तर माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button