breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

…म्हणूनच भाजपचे कार्यकर्ते राजीनामे देत आहेत, एकनाथ खडसेंचा भाजपवर निशाना

जळगाव: ‘राज्यभरात भाजपाचे कार्यकर्ते नाराज आहेत. म्हणूनच ते राजीनामे देत आहेत’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीका केलेली आहे. अहमदगरमध्ये भाजपच्या 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडालेली आहे. एकनाथ खडसे आज सकाळी जळगावात त्यांच्या मुक्ताई निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी पत्रकारांनी खडसेंना अहमदनगर जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याबाबत विचारणा केलेली असता, खडसे म्हणाले की, ‘संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे देण्यास सुरुवात झालेली आहे. हे कार्यकर्ते नाराज असल्यानेच ते राजीनामे देत आहेत. नाराजीचा हा परिणाम आहे’, असे खडसे यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button