breaking-newsआंतरराष्टीय

रोनाल्डो व मेस्सीचा शिरच्छेद करण्याची आयसिसची धमकी

सिरीया : आयसिस या दहशतवादी संघटनेने ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दिग्गज फुटबॉ़लपटूंचा शिरच्छेद करण्याची धमकी दिली आहे. एका ग्रुपवर धमकीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. रशियात पुढील महिन्यापासून फुटबॉल वर्ल्डकपला सुरुवात होणार आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आयसिसने रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना धमकी दिली होती.

‘सीरियातील मुस्लिमांच्या हत्येचा बदला घेतला जाईल’, असे आयसिसने म्हटले होते. आयसिसने एक फोटो देखील जाहीर केला होता. या फोटोत रशियातील फुटबॉल मैदानात एक दहशतवादी हातात एके ४७ बंदुक घेऊन उभा असल्याचे दाखवण्यात आले होते.

आयसिसने शेअर केलेल्या व्हिडिओत आयसिसचे दहशतवादी रोनाल्डो आणि मेस्सीचा शिरच्छेद करतानाच मॉर्फ केलेला फोटो आहे. आयसिसच्या या व्हिडिओनंतर रशियात होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपमधील सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button