breaking-newsराष्ट्रिय

ऑक्सफर्डच्या लसीची दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी भारतात होणार

नवी दिल्ली – जगभरात कोरोनावर प्रतिबंध म्हणून लस शोधली जात आहे. त्यातच, भारताच्या ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’च्या (सीडीएससीओ) तज्ज्ञांच्या समितीने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे.

‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ला संपूर्ण मूल्यांकनानंतर सब्जेक्ट एक्सपर्ट समितीच्या तज्ज्ञांनी एक शिफारस केली आहे. यामध्ये सिरम इन्स्टीट्यूला ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यास सांगितलं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं दिली. या आठवड्याच्या सुरुवातीला समितीने सिरम इन्स्टिट्य़ूटला लसीच्या वैद्यकीय चाचणीसाठी सुधारित प्रोटोकॉल तयार करण्यास सांगितलं होतं. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अ‍ॅस्ट्राझेनेकाबरोबर या लसीला विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे.

अमेरिका आणि भारतासह अनेक देशातील लस प्रगतीपथावर आहे. तसेच, ऑक्सफर्डच्या ज्या लसीवर संशोधन सुरू आहे त्याचे सुरूवातीचे निकाल उत्तम आहेत. तसंच ही लस सुरक्षितही आहे अशी माहिती लॅन्सेन्ट मेडिकल जर्नलनं आपल्या अहवालात दिली आहे. ऑक्सफर्डच्या संशोधकांसोबत भागीदार असणारी जगातील सर्वात मोठी लसनिर्मिती कंपनी सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी सुरूवातीच्या चाचणीमध्ये लसीचे सकारात्मक निकाल आले असून आम्हाला याचा प्रचंड आनंद असल्याचं म्हटलं होतं. भारताच्या दृष्टीने या लसीचं यशस्वी होणं महत्त्वाचं आहे. कारण या लसीसाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. जगभरात अनेक लसी विकसित केल्या जात असून ऑक्सफर्डची लस त्यापैकी एक आहे. ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्याचं यश आता फार महत्त्वाचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button