breaking-newsताज्या घडामोडीपुणे

माजी आमदार विलास लांडे यांच्याकडूनही ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’; नवनिर्वाचित आमदार महेश लांडगेंना दिल्या शुभेच्छा

भोसरी विधानसभा मतदार संघातील मतदारांचे मानले आभार

नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहणार असल्याचा विश्वास

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

निवडणूक संपली…राजकारण संपले… विरोध होता तो वैचारिक आणि विकासकामांसाठीचा अजेंडा कायम राहिल… या भूमिकेतून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनिर्वाचित आमदार महेश लांडगे यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छाही दिल्या आहेत.

        भोसरी विधानसभा मतदार संघाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असे संकेत होते. माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या विरोधात आमदार महेश लांडगे यांनी भाजप-सेना महायुतीचे उमेदवार म्हणून दंड थोपाटले होते. पैलवान आणि वस्ताद असा कलगीतुरा निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच रंगला होता. दोन्ही नेत्यांच्या जाहीर सभेत तुफान आरोप-प्रत्यारोप झाले होते. राजकारणात जय-पराजय होत असतात. राजकारणातील मुरब्बी व्यक्तीमत्त्व असलेले विलास लांडे यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, जनमताचा कौल मान्य करीत ‘वस्ताद’ विलास लांडे यांनी खिलाडू वृत्तीने नवनिर्वाचित आमदार लांडगे यांचे अभिनंदन केले.

        वास्तविक, ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’ ही संकल्पना भोसरीत रुजवण्यासाठी आमदार महेश लांडगे प्रयत्न करीत आहेत. त्याची चांगली सुरूवात झाल्याचे पहायला मिळत आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर माजी आमदार विलास लांडे यांनी सोशल मीडियावर कार्यकर्ते, मतदार आणि हिंतचिंतकांसाठी आभाराची भावनिक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की,

सर्वांचे जाहीर आभार!

दर पाच वर्षांनी येणारी निवडणूक जनतेला जनतेचा कारभारी निवडण्याची संधी देत असते. भोसरीच्या सर्वांगीण आणि सुनियोजित विकासाचा संकल्प घेवून अत्यंत कमी कालावधीत प्रचार यंत्रणा राबवून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. माझे सर्वपक्षीय सहकारी-साथीदार,, हितचिंतक, कार्यकर्ते आणि आपण सर्व मतदार बंध-भगिनींनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे प्रचार यंत्रणेचा भाग होवून भोसरी विधानसभा मतदार संघाच्या विकासाचा संकल्प घरोघरी पोहोचवला. आज निवडणुकीचा निकाल लागला. आयुष्यात आजवर अनेक चढउतार मी पाहिले. त्याचप्रमाणे आजचा जनमताचा कौल मी मान्य केला आहे. पण, आपण प्रचारादरम्यान जे भरभरुन सहकार्य केलं. रात्रंदिवस मेहनत करुन माझे संकल्प, माझे विचार घरोघरी पोहोचवले. त्याबद्दल मी आपला शतश: ऋणी आहे. निवडणुकीत माझा पराभव जरी झाला असला तरीही आपलं अमूल्य मत मला देवून आपण माझ्यावर विश्वास दाखवला, तो विश्वास मी कदापि ढळू देणार नाही. आपल्या सर्व समस्या, अडचणी आदी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी नेहमीच सदैव तत्पर आणि सक्रीय असेन. तसेच, भोसरी विधानसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित आमदारांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

विलास विठोबा लांडे, प्रथम आमदार भोसरी विधानसभा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button