breaking-newsपिंपरी / चिंचवड
रस्ता अडवण्याचा प्रयत्न केल्याने पिंपरीतील व्यवसायिक आक्रमक, प्रशासनाची मागार
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी येथील मंडईचा रस्ता बंद करण्यासाठी महापालिकेच्या ‘अ ‘ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तेथे आले होते. मात्र, त्याची माहिती मिळताच तेथे वर्षानुवर्षे व्यवसाय करणारे विक्रेते जमा झाले. नेमके ते पत्रे लावून कशासाठी रस्ता बंद करीत आहे, त्याची माहिती न दिल्याने विक्रेते संतप्त झाले. त्यांनी त्या कामास विरोध केला.
तसेच, रस्ता बंद करून तुम्ही काय करणार, टाळेबंदीमुळे आमची उपासमार होत आहे. आम्हाला येथे व्यवसाय करू द्या, असे सांगत येथे पत्रे लावून देणार नसल्याची भूमिका घेतली. दरम्यान, विक्रेत्यांनी विरोध केल्यामुळे महापालिकेचे अधिकारी तेथून माघारी फिरले. त्यामुळे तणाव निवळला.