breaking-newsआंतरराष्टीय

जवानांकडून 3 घुसखोर अन् 2 पाक सैनिकांचा खात्मा

नवी दिल्ली | महाईन्यूज

पाकिस्तानकडून रात्रभर भारताच्या बाजूकडच्या नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबाराच्या आडून घुसखोरांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसवण्याचा पाकिस्तानचा डाव जवानांनी उधळून लावलेला आहे. जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळच्या भागात गोळीबार करण्यात आलेला आहे. त्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. 

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराच्या उत्तरादाखल भारतीय जवानांनी पाकचे दोन सैनिक आणि तीन घुसखोरांना ठार केले आहे. इतर चार सैनिक जखमी झालेले आहेत. तसेच नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानच्या चौक्यांचंही मोठ नुकसान झालेलं आहे. जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये मध्यरात्री पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला होता. तसेच राजौरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमधल्या सुंदरबनी आणि नौशेरामध्ये पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला आहे. या गोळीबारात भारतीय सेनेचे जवान सीजे गणपती शहीद झाले आहेत, तर इतर एक जवान जखमी झालेला आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button