breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

एसटी लवकरच मालवाहतुकीत

पडीक जागांवर ३०१ गोदामे उभारणार

एसटी महामंडळ उत्पन्नवाढीसाठी मालवाहतूक सेवा आणि गोदाम व्यवसायात उतरणार आहे. त्यासाठी तीन हजार जुन्या बसचे मालवाहतूक वाहनांत रूपांतर करण्याबरोबरच नवीन मालवाहतूक वाहनेही खरेदी करण्यात येणार आहेत.

पडून असलेल्या ३०१ जागांवर गोदामे सुरू करण्यात येतील, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार कंपनीने याबाबतचे सादरीकरण गुरुवारी सह्य़ाद्री अतिथिगृहात केले. याबाबतच्या प्रस्तावात परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी काही सुधारणा सुचविल्या. बैठकीला एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल व अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. मालवाहतूक सेवेत शिधावाटप दुकानांना पुरवण्यात येणारे धान्य, पोषण आहाराचे धान्य आदींची वाहतूक करण्याचाही प्रस्ताव आहे.

या सेवेसाठी स्वतंत्र वाहनेही वापरण्यात येणार आहेत. प्रवासी बसचे नऊ वर्षांनंतर सर्व तांत्रिक बाबी पडताळून मालवाहतूक वाहनांमध्ये रूपांतरण करण्यात येईल. परिवहन विभागाची रीतसर मान्यता घेऊनच वाहने मालवाहतुकीसाठी वापरण्यात येतील.

मालवाहतूक आणि गोदामांच्या व्यवस्थापनासाठी सहव्यवस्थापकीय संचालक हे पद निर्माण करण्यात येईल. तसेच स्वतंत्र विभाग आणि स्वतंत्र कर्मचारी वर्गही नियुक्त केला जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी यांना किफायतशीर दरात मालवाहतूक साधन मिळेल, असे रावते यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button