breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

एसटी भाडेवाढ १५ टक्केच होणार ?

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांची नवीन वेतनवाढ जाहीर झाली असतानाच, डिझेल-सुट्या भागांचे वाढते दर आदी कारणांमुळे एसटीवरील आर्थिक बोजा वाढत आहे. तो कमी करण्यासाठी महामंडळाने ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला असला तरीही प्रत्यक्षात १५ टक्के इतकीच भाडेवाढ होणार असल्याचे संकेत दिले जात आहे. ३० टक्के भाडेवाढीचा बागुलबुवा दाखवत ३० ऐवजी १५ टक्के भाडेवाढीचा निर्णय घेऊन प्रवाशांचा रोष कमी केला जाईल, अशी शक्यता आहे.

एसटी महामंडळाच्या तोट्यात डिझेल दरवाढीमुळे दररोज साडेतीन कोटी रुपयांची भर पडत आहे. कर्मचाऱ्यांचा नवीन वेतन करार, सुट्या भागांच्या दरांमधील वाढीमुळे तोट्यात आणखी भर पडली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी भाडेवाढ हाच एकमेव पर्याय महामंडळासमोर उरला आहे. त्यासाठीच महामंडळाने ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करून अंतिम मंजुरीसाठी रावते यांच्यासमोर मांडला आहे. पण, एवढ्या जास्त प्रमाणात भाडेवाढ केल्यास एसटीचे प्रवासी कमी होऊन ते खासगी वा अवैध वाहतुकीकडे वळण्याचीही भीती आहे.

सध्याचे तिकीट दर हे खासगी बसवाहतुकीच्या आसपास पोहोचले आहेत. त्यामुळेही काही प्रमाणात प्रवासी खासगी बसवाहतुकीकडे वळले आहेत. या दरांमध्ये आणखी ३० टक्के वाढ केल्यास प्रवासी एसटीपासून दुरावतील, असाही मतप्रवाह आहे. अशा स्थितीत ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करून प्रत्यक्षात १५ टक्के दरवाढ पदरात पाडून घेण्याचा महामंडळाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button