breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

नवी दिल्ली – अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी ऍमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस यांना मागे टाकत स्पेसएक्स आणि टेस्ला या जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचे संस्थापक एलन मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये गुरुवारी ४.८ टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत ५०० लोकांच्या ब्लूमबर्गच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचले. जेफ बेजोस ब्लूमबर्गच्या या यादीत ऑक्टोबर २०१७ पासून पहिल्या स्थानावर होते. हे स्थान आता एलन मस्क यांनी पटकावलं आहे.

दक्षिण अफ्रेकत जन्मलेल्या मस्क यांची काल १८८.५ अब्ज डॉलर संपत्तीची नोंद झाली. ही बेजोस यांच्या तुलनेत १.५ अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. गेल्या काही वर्षांत एलन मस्क यांच्या संपत्तीत बरीच वाढ झाली आहे. एका निरिक्षणानुसार, गेल्या वर्षी मस्क यांच्या संपत्तीत १५० अब्ज डॉलरपेक्षा अधिक वाढ झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button