breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाला प्रथम क्रमांकाचा ‘ग्रीन हॉस्पिटल’ पुरस्कार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

असोशिएशन ऑफ हेल्थ केअर प्रोव्हायडर्स, दिल्ली यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या सर्वेक्षणात पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटल व संशोधन केंद्राला प्रथम क्रमांकाचा ग्रीन हॉस्पिटल पुरस्कार प्रदान करण्यात आला. ७ फेब्रुवारी रोजी बंगलोर येथील हॉटेल ललित अशोक मधील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.  

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्या हस्ते डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी ग्रीन हॉस्पिटल हा पुरस्कार सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारला. यावेळी असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. अलेक्सझेंडर थॉमस, डायरेक्ट जनरल डॉ. गिरीधर ग्यानी तसेच डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.एच. एच. चव्हाण उपस्थित होते. 

असोशिएशन ऑफ हेल्थ केअर प्रोव्हायडर्सच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध संस्थांचा यात समावेश होता. ग्रीन हॉस्पिटल सर्वेक्षणात डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटल व संशोधन केंद्राला प्रथम क्रमांक मिळाला. सर्वेक्षणात रुग्णालय व परिसरातील वृक्षाचे जतन संवर्धन, पर्यावरण पूरक साधनांचा वापर, पाण्याचे योग्य नियोजन व शुद्धीकरण, पुनः वापर, सौरऊर्जा प्रकल्प, खतनिर्मिती प्रकल्प, आधुनिक यंत्रणेतून विजेची बचत, प्लास्टिक बंदी, प्रदूषण मुक्त वाहनाचा वापर, स्वच्छता, देखभाल, संसर्ग नियंत्रण, जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन, निर्जंतुकीकरण प्रक्रिया, जनजागृती, भिंतीचित्रांद्वारे संदेश फलक आदी प्रमुख घटकांचे सर्वेक्षण करण्यात आले. 

उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्री पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, संचालिका डॉ. स्मिता जाधव, ट्रस्टी व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर यांनी हॉस्पिटल मधील पुरस्कारासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक केले.

या संपूर्ण मोहिमेत डॉ. पी. डी. पाटील व डॉ भाग्यश्री पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

हा पुरस्कार म्हणजे कौतुकाची थाप – डॉ. पी. डी. पाटील

“आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्रीन हॉस्पिटल पुरस्कार आमच्या हॉस्पिटला मिळणे ही फार अभिमानाची बाब आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल पिंपरी, पुणे हे पर्यावरण पूरक घटकांची अंमलबजावणी करीत आधुनिक ऊर्जा संसाधन वापरा बरोबर ऊर्जा बचतीला तसेच पर्यावरण जतन व संवर्धनाला प्रोत्साहन देत आहे. हा पुरस्कार आज मिळाल्याने अधिकच आनंद होत आहे. मिळालेली ही कौतुकाची थाप अधिकच उत्साह वाढविणारी आहे. यातूनच पुढे काम करायला प्रोत्साहन मिळाले आहे. ग्रीन हॉस्पिटल हा पुरस्कार मिळविण्यात सर्वांचेच योगदान फार महत्त्वाचे आहे” असे प्रतिपादन  कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी  केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button