breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर

नागपूर – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना ते भेट देतील. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे नागपुरात आगमन होईल. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने गोसेखुर्द धरणाकडे रवाना होणार आहेत.

वाचा :-पुण्याचे जवान संभाजी राळे यांना अरुणाचल प्रदेशात वीरमरण

गोसेखुर्द प्रकल्प 2023पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्षी 2 हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे पाटबधारे विभाकडून सांगण्यात आले होते. जुलैमध्ये पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला होता. त्यावेळी प्रकल्पाच्या पुनर्वसनाला गती देण्याची सूचना केदार यांनी दिली होती. तसेच गोसेखुर्द प्रकल्पाची सुधारीत प्रशासकीय मान्यता 18 हजार 494 कोटी रुपयांची आहे. तर प्रकल्पाची एकूण क्षमता 1146 दलघमी आणि सिंचन क्षमता 2 लाख 50 हजार 800 हेक्टर इतकी आहे. गोसेखुर्द धरणावर खासगीकरणांतर्गत 2 विद्यूत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 डिसेंबर रोजी सातारा, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याचा दौैरा केला. रत्नागिरी येथे दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोफळी प्रकल्पाची पाहणी केली. पोफळी जलविद्युत प्रकल्पातील विद्युतगृहाचीही पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button