breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘एमपीएससी’द्वारे पोलीस उपनिरीक्षक भरती प्रक्रियेची सुधारित जाहिरात प्रसिध्द करा

  • राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष भरत महानवर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक गट ब पदांच्या भरती प्रक्रियेत एनटी- क आणि एनटी- ड प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून तो दूर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष भरत महानवर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात महानवर यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक गट ब पदाच्या भरती पूर्वपरीक्षेसाठी 2020 ची जाहिरात प्रसिध्द झाली आहे. यातून पोलीस उपनिरीक्षक (गट ब) (अराजपत्रित) पदाच्या 650 जागा भरण्यात येणार आहेत. त्यातील 475 जागा या विविध प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. परंतु, शासन निर्णयाप्रमाणे भज- क (एनटी – क) प्रवर्गासाठी 3.5 टक्के जागा राखीव असताना प्रत्यक्षात मात्र, 2 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

प्रत्यक्षात 22 जागा आरक्षित असायला हव्या आहेत. तसेच, भज- ड आणि एनटी- ड या प्रवर्गासाठी 2 टक्के राखीव जागा असताना एकही जागा आरक्षित दाखविलेली नाही. त्यामुळे परीक्षेची तयारी करणा-या भज- क आणि भज- ड प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. आपण स्वतः लक्ष घालून या भरती प्रक्रियेची सुधारित जाहीरात प्रसिध्द करण्याचे निर्देश संबंधीत विभागाला द्यावेत, अशी मागणी महानवर यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button