breaking-newsपिंपरी / चिंचवड

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पालिका शाळांमध्ये आमुलाग्र बदल करणार – सभापती सोनाली गव्हाणे

शिक्षण समितीच्या बैठकीत महत्वपुर्ण निर्णय 

पिंपरी –  महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मुलभूत गरजांसह त्यांना तणावमुक्त अभ्यास, विविध सोयी-सुविधा आणि गुणवत्ता वाढीसाठी अभ्यासक्रमांचा डिजीटल अॅप लवकरच कार्यान्वित करणार आहे, अशी माहिती शिक्षण समिती सभापती प्रा.सोनाली गव्हाणे यांनी दिली. 

महापालिकेच्या शिक्षण समितीची आज ( गुरुवारी) स्थायी समिती सभागृहात सभापती सोनाली गव्हाणे याचे अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी उपसभापती शर्मिला बाबर, समितीचे सर्व सदस्य, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांना मान्यता देण्यात आली.

गव्हाणे पुढे म्हणाल्या की, शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या २ ऑगस्ट २०१८ आदेशानुसार विद्यार्थ्यांचा ताणमुक्त अभ्यास व परिक्षेतील ताण कमी करण्यासाठी मेंदूशास्त्र, मानसशास्त्र इ. विविध शास्त्रांवर आधारीत प्रयोग, अभ्यासाच्या सोप्या पध्दती परीक्षा काळातील धैर्य, परिक्षा काळातील धैर्य, स्मरणशक्ती वाढविणे, त्याच बरोबर सर्वांगिंण विकासासाठी प्रयत्न कसे करावेत, याचे मार्गदर्शन नि:स्वार्थ युवा कार्यकर्ते डॉक्टर्स, इंजिनियर्स, शिक्षणतत्र, विचारवंत यांच्या सहकार्याने मनशक्ती प्रयोग केंद्र, रेस्ट न्यु वे, लोणावळा यांचेकडून नि:शुल्क करण्यात येत आहे. तरी या शासन निर्णयानुसार दिलेल्या अटींचे पालन करुन व शालेय अभ्यासक्रमावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन मुख्याध्यापकांचे अधिपत्याखाली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सदर उपक्रम राबविणेकामी मान्याता देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्राथमिक शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निरोधक यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या शाळांमधील विविध ठिकाणी मुख्याध्यापक कार्यालय, प्रयोग शाळा, विद्युत मीटर बॉक्स, शाळा वर्ग या ठिकाणी असणारे विद्युत यंत्रणा, फर्निचर, शालेय बेंच तसेच इतर साधन सामग्रीस आग लागण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. तरी या ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव अग्निशमन यंत्रणा उभारणे अत्यंत महत्वाचे आहे. महानगरपालिकेच्या इतर कार्यालयांमध्ये देखील अग्निशामक यंत्रणा बसविणेत आली आहे. त्याप्रमाणे मनपाच्या प्राथमिक शाळांमध्ये देखील अग्निशामक विभागाकडील उपलब्ध तरतूदीमधून अग्निशामक विभागाकडील अधिकाऱ्यांनी मनपा शाळांची पाहणी करुन या विभागाच्या अधिपत्याखाली त्याप्रमाणे अग्निशमन यंत्रणा उभारणेकामी मान्यता देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्राथमिक शाळांमध्ये मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने वॉटर फिल्टर बसविणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाण्याच्या टाकीमधून पाणी पिणेसाठी सोय केलेली आहे. तरी यामध्ये पिण्याचे पाण्याची टाकी वेळेवर साफसफाई करणेत आली नसल्यास विद्यार्थ्यांना दुषित पाणी पिण्यामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे. तसेच काही वेळा पिण्याचे पाण्याची पाईपलाईन फुटली असल्यास त्यामधून दुषीत पाणी टाकीमध्ये आल्यास टाकीमध्ये दूषीत पाणी होण्याची शक्यता आहे. तरी  मनपाच्या शाळांमध्ये पाण्याच्या टाकीमधून पाणी फिल्टर करुन दिल्यास विद्यार्थ्यांना चांगले व स्वच्छ पाणी पिण्यास देता येऊ शकते. तरी मनपा शाळांमध्ये वॉटर फिल्टर बसविणेकामी मान्यता देण्यात आली
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागाच्या १८ शाळां कार्यरत असून यामध्ये असणारे १० वी च्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये बदल झालेला असुन या विद्यार्थ्यांना सदर अभ्यासक्रम समजणे अवघड जात आहे. सद्यपरिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना  डिजीटल ऍ़प द्वारे अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ होणे गरजेचे असून त्याअनुषंगाने ऍ़पद्वारे मुलांना चांगल्या प्रकारे टिप्स व टेक्निक, बदललेल्या प्रश्न पत्रिकेचे स्वरुप, व सरावासाठी प्रश्न पत्रिका उपलब्ध करुन देता येतील. तसेच ऍपद्वारे मार्गदर्शन करणेसाठी तज्ञ शिक्षकाचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेच्या आधी व परिक्षा कालावधीमध्ये येणारा ताण तणाव याचे समुपदेशन होऊन गुणवत्ता वाढ होईल. तरी १० वी च्या विद्यार्थ्यांना ऍप द्वारे अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन करणेकामी मान्यता देण्यात आली.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button