breaking-newsताज्या घडामोडी

‘उमर खालिदने अमरावतीमध्ये दंगल घडवून आणण्यासाठी चितावणीखोर भाषण केले’, भापने आरोप करत शेअर केला व्हिडिओ

अमरावती | दिल्‍लीत झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला आहे तर 200 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. यादरम्यान दिल्लीतील भाजप नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा आणि काही इतर भाजप नेत्यांनी देशद्रोहाच्या प्रकरणातील आरोपी जेएनयू विद्यार्थी उमर खालिदचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो ट्रंप भारतात आल्यावर रस्त्यावर उतरण्याची अपील करत आहे.

हा व्हिडिओ अमरावतीचा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापूर्वी 17 फेब्रुवारीचा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. ट्रम्प आल्यानंतर पुर्व दिल्लीमध्ये हिंसाचार भडकला.

अमित मालवीयने ट्विटरऴर लिहीले- ‘उमर खालिद आधीपासूनच देशद्रोहाच्या खटल्यात दोषी आहे, 17 फेब्रुवारीला त्याने अमरावतीमध्ये एक भाषण केले. तिथे त्याने मुस्लिम समाजातील लोकांना संबोधित केले आणि 24 फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान रस्त्यावर उतरण्याची अपील केली. त्यामुळे दिल्लीतील हिंसाचार तुकडे-तुकडे गँगकडून झाल्याचे स्पष्ट होत नाही ?’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button