breaking-newsक्रिडापुणेमहाराष्ट्र

एनआयओ व्हिजन मॅरेथॉन येत्या रविवारी रंगणार

  • सुमारे 1500 धावपटू सहभागी

पुणे: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थेल्मॉलॉजी (एनआयओ) आणि रनबडीज क्‍लब यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या एनआयओ व्हिजन अर्धमॅरेथॉन स्पर्धेत 1500 धावपटूंनी आपला सहभाग निश्‍चित केला असून यामध्ये 500 “ब्लाईंड फोल्डेड’ धावपटू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा रविवार, दि. 22 जुलै रोजी होणार आहे.

रनबडीज क्‍लब या शहरांतील महत्त्वाच्या संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा 3 कि.मी, 5 कि.मी, 10 कि.मी, 15 कि.मी आणि 21 कि.मी. अशा प्रकारांमध्ये होणार आहे. रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्‍सलेन्स, बाणेर येथे स्पर्धेचा फ्लॅग ऑफ होईल. स्पर्धेचा मार्ग रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्‍सलेन्स, बाणेर येथे प्रारंभ झाल्यावर औंधच्या दिशेने पुन्हा फिरून रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्‍सलेन्स, बाणेर येथे परत असा असणार आहे. स्पर्धेचा फ्लॅग ऑफ एनआयओ व्हिजनचे डॉ. श्रीकांत केळकर व एनआयओच्या संचालिका जाई केळकर यांच्या हस्ते होणार आहे.

एनआयओ व्हिजन मॅरेथॉन स्पर्धा यावर्षी “बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. याआधी इंग्लंडमध्ये डोळे बांधून धावण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्याच धर्तीवर एनआयओ व्हिजन मॅरेथॉनमध्येही ब्लाईंड फोल्डेड धावपटूंच्या संख्येचा विक्रम प्रस्थापित होण्याची अपेक्षा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button