breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

बॉलिवूडचा दिग्दर्शक साजिद खानवर पुन्हा एकदा लैंगिक शोषणाचा आरोप

मुंबई – बॉलिवूडचा दिग्दर्शक साजिद खानवर पुन्हा एकदा लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. दिवंगत अभिनेत्री जिया खानची बहिण करिश्मा हिने साजिद खानने जियाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

जिया खानच्या आयुष्यावरील ‘डेथ इन बॉलिवूड’ ही डॉक्युमेंट्री नुकतीच यूकेत प्रदर्शित झाली. या डॉक्युमेंट्रीच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये करिश्माने साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. साजिदच्या गैरवर्तनाने जियाला जबर धक्का बसला होता. ती आतून कोलमडली होती. ती घरी आली तशी रडू लागली. साजिद खानने तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा करिश्माने केला आहे. करिश्माने सांगितले की, रिहर्सल सुरु असताना जिया स्क्रीप्ट वाचत होती तेवढ्यात साजिद खान तिथे आला. त्याने जियाला टॉप आणि ब्रा काढण्यास सांगितले होते. त्यावेळी जिया घाबरली आणि घरी आली. ती घरी आल्यावर रडू लागली.

करिश्मा म्हणाली, ‘जियाने त्यांच्यासोबत करार केला असल्यामुळे तिला त्या चित्रपटात काम करावे लागले. एकदा रिहर्सल सुरू होती आणि जिया स्क्रिप्ट वाचत होती. यादरम्यान साजिदने जियाला तिचे टॉप व ब्रा उतरवण्यास सांगितले. त्यावेळी जिया प्रचंड घाबरली. काय करावे तिला कळत नव्हते. चित्रपट सुरु होण्यापूर्वीच ही स्थिती आहे, हा विचार करून तिला मोठा धक्का बसला होता. घरी येऊन ती ढसाढसा रडली होती. इतके होऊनही तिला त्या चित्रपटात काम करावे लागले. मी करार केला आहे. मी चित्रपट केला नाही तर ते मला बदनाम करतील. माझे करिअर संपुष्टात येईल, असे ती म्हणाली होती. चित्रपटात राहिली तर लैंगिक शोषण होईल आणि तो सोडला तर करिअर संपेल, या दृष्टचक्रात ती अडकली होती. मात्र तरीही तिला तो चित्रपट करावा लागला.’ हा चित्रपट ‘हाऊसफुल’ होता. यात अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, जॅकलिन फर्नांडिस, रितेश देशमुख, लारा दत्ता, अर्जुन रामपाल व जिया खान मुख्य भूमिकेत होते.

तसेच पुढे करिश्मा म्हणाली, ‘साजिदने केवळ माझी बहीण जियासोबतच नाही तर माझ्यासोबतही गैरवर्तनाचा प्रयत्न केला. मला आठवते, मी जियासोबत साजिदच्या घरी गेले होते. मी तेव्हा 16 वर्षांची होते. मी किचन टेबलवर बसले होते आणि तो एकटक माझ्याकडे बघत होता. अचानक, हिला सेक्स करायचे आहे, असे माझ्याकडे पाहून तो म्हणाला. जियाने त्याला लगेच टोकले. काय बकवास करतोय तू? असे जिया त्याला म्हणाली. यावर ती बघ कशी बसली आहे, असे तो म्हणाला. यानंतर आम्ही दोघी बहिणी तिथून निघून आलो’, असे तिने सांगितले.

दरम्यान, यापूर्वी मॉडेल पौलाने दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित पौलाने साजिदवर धक्कादायक आरोप केले होते. ‘साजिद मला अश्लील मेसेज पाठवायचा. मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. त्याने मला त्याच्यासमोर विवस्त्र व्हायला सांगितले. हाऊसफुल चित्रपटात भूमिका देण्याच्या बदल्यात साजिदने मला विवस्त्र व्हायला सांगितले. त्याने असे किती महिलांसोबत केले आहे, हे देवच जाणो. मी कोणाच्या सांगण्यावरून हे सर्व उघड करत नाही. तेव्हा मी बोलू शकले नव्हते पण आता पुरे झाले. त्याला कारागृहात डांबले पाहिजे’, अशी पोस्ट पौलाने लिहिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button