breaking-news

बायकोचं अनोख आंदोलन “येत कसा नाही आलाच पाहिजे”, नवरा अमेरिकेतून परत येत नसल्याने आंदोलन

औरंगाबाद | महाईन्यूज

आपल्या मागण्यांसाठी किंवा प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी लोक आंदोलन करत असल्याचं चित्र आपण अनेकदा पाहिलेलं आहे. पण एखादी महिला आपल्या पतीविरोधात आंदोलनाला बसल्याचं आपण कधी ऐकलं किंवा पाहिलेलं नसेल. पण असाच एक प्रकार सध्या औरंगाबादमध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे. औरंगाबादमधील वैजापूर येथे महिलेने आपला पती अमेरिकेहून परत येत नाही म्हणून थेट आंदोलन पुकारलेलं आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात ती एकटी नसून तिचं संपूर्ण कुटुंबही आंदोलन करत आहे. सासरच्या दारातच सुरु असलेल्या या आंदोलनात घोषणाबाजी देत न्याय देण्याची मागणी तिची होत आहे.

प्राजक्ता डहाळे असं या महिलेचं नाव आहे. आपला पती अमेरिकेला गेला असून वारंवार विनंती करुनही परत येत नाहीये. म्हणूनच आपण आंदोलन करत असल्याचं तीने सांगितले आहे. दरम्यान आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप प्राजक्ता डहाळे यांनी केलेला आहे. “१३ जानेवारी रोजी आपण जे आंदोलन केलं ते आपला पती अमेरिकेतून परत यावा यासाठी केलेलं होतं. उपोषानंतर सासू, दीर यांनी आपल्याला मारुन टाकण्याची धमकी दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला पोलीस संरक्षण द्यावं व तसंच पती लवकरात लवकर भारतात परत यावा यासाठी सहकार्य करावं,” अशी विनंती प्राजक्ता डहाळे यांनी केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button