breaking-newsताज्या घडामोडीपुणे

एटीएम मशिनमध्ये स्किमर लावून लाखो रुपये हडप करणा-या तीन चोरट्यांना अटक

पुणे |महाईन्यूज|

नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड ) रस्ता परिसरातील क्राऊन बेकरीसमोर असलेल्या ‘आयसीआयसीआय’च्या एटीएम मशिनमध्ये स्किमर लावून नागरिकांचे लाखो रुपये हडप करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली.

विश्वजित छत्री (वय ३३, दांडा खार, मुंबई), प्रकाश शेट्टी (वय ४६, दहिसर, मुंबई), फैजी अल्ताफ रझा (वय ४३, टिळक कॉलनी, अंबरनाथ, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत स्वाती मांढरे (वय ३९, आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार मांढरे यांनी २६ सप्टेंबरला सनसिटी भागात असलेल्या आयसीआयसीआय एटीएम मशिनमधून दहा हजार रुपये काढले होते. त्यानंतर ३० सप्टेंबरला त्या घरी असताना त्यांना ४० हजार रुपये बँक खात्यातून कमी झाल्याचा मोबाइलवर मेसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांकडे तक्रार दिली होती.

या एटीएम मशिनमध्ये व्यवहार करणाऱ्या बऱ्याच नागरिकांना अशाप्रकारे गंडा घातल्याची तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. सायबर पोलिसांनी तपास करून या तीनही आरोपींना बालेवाडी परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली. सायबर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण औटे, पोलिस नाईक दीपिका मोहिते, पोलिस शिपाई शिरीष गावडे, अनिल पुंडलिक, सोमनाथ भोरडे यांनी ही कामगिरी केली.

असे काढले जातात पैसे

एटीएम मशिनच्या की-पॅडवर नागरिकांच्या लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने पिनहोल सर्किट कॅमेरा लावला जातो. एटीएम कार्ड ज्या ठिकाणी घातले जाते त्याठिकाणी ‘स्किमर’ (डाटा कॉपी करणारे बोटाच्या नखा इतके यंत्र) लावले जाते. हे रेकॉर्डिंग लॅपटॉप व कार्ड राईटच्या मदतीने हुबेहूब खोटे एटीएम कार्ड तयार करून एटीएम मशिनमधून पैसे काढले जातात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button