breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

राष्ट्रवादीने थेट फेसबुक, ट्वीटरकडे केली ‘ही’ मोठी मागणी

मुंबई |महाईन्यूज|

मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी फेसबुक आणि ट्वीटरवर जी फेक अकाउंट्स तयार करण्यात आली होती त्याचे मालक कोण? आणि ही फेक अकाउंट्स कुठल्या आयपी अड्रेसवरून तयार करण्यात आली याची माहिती फेसबुक आणि ट्वीटर या कंपन्यांनी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

महाविकास आघाडी सरकारला आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप आयटी सेलच्या माध्यमातूनच करण्यात आला आहे, असा थेट आरोपच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला असून सोशल मीडियावरील फेक अकाउंट्सवरूनही त्यांनी भाजपला लक्ष्य केले.

सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित पोस्ट टाकण्यासाठी फेसबुक आणि ट्वीटरवर ८० हजार फेक अकाउंट्स उघडण्यात आली. या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीस तसेच मंत्र्यांची बदनामी करण्यात आली. बिहारच्या निवडणुकीत राजकीय फायदा होईल, यासाठीच ही अकाउंट्स उघडण्यात आल्याचा पर्दाफाश मिशीगन युनिव्हर्सिटीच्या नामांकित लोकांनी तयार केलेल्या अहवालात केला आहे. सुशांत प्रकरणात भाजप व त्यांच्या आयटी सेलने महाविकास आघाडी व मुंबई पोलिसांना बदनाम केल्याचे आणि त्याचा फायदा भाजपला झाल्याचे मिशीगन युनिव्हर्सिटीच्या याच अहवालात नमूद करण्यात आले आहे, असे नमूद करत या अकाउंट्सच्या मुळाशी जाण्याची गरज असल्याचे तपासे यांनी नमूद केले. फेसबुक आणि ट्वीटरने याबाबत माहिती द्यायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button