breaking-newsपिंपरी / चिंचवड

एजिओ फार्मा कंपनीकडून पीएम केअर्स फंडाला मदत; आमदार महेश लांडगे यांच्याकडे धनादेश सूपुर्द

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
कोरोना विरुद्ध लढाईत केंद्र आणि राज्य सरकाराला मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. औषध क्षेत्रात काम करणाऱ्या एजिओ फार्मासिटीकल्स लिमिटेड कंपनीसुद्धा खारीचा वाटा उचलत पंतप्रधान केअर्स फंडामध्ये मदत केली आहे. त्यामदतीचा धनादेश भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला.
भोसरी-एमआयडीसी येथे कंपनीची शाखा आहे. एजिओ कंपनीच्या वतीने ३ लाख २५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी कंपनीचे मालक मधुसुदन रुईया, राघव रुईया यासह व्हाईस प्रेसिडेंट जयश्री नायर, प्लॅन्ट हेड शिवमुरत यादव, कामगार प्रतिनिधी विलास बालवडकर, हनुमंत (बाळा) शिंदे, रतन नांदुरकर, दिपक मोळक, चंद्रकांत जाधव, मनोज पाचे, शिवराज पाटील तसेच कर्मचारी उपस्थित होते.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे म्हणाले की, देशातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आता सुमारे ७० हजारांच्या घरात आहे. महाराष्ट्रातही २३ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. लॉकडाउनमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे. या संकटकाळात राज्य आणि केंद्र सरकारला मदत करण्यासाठी दारशूर उद्योजक, कंपन्या, सामान्य नागरिकसुद्धा पुढे येत आहेत. सामाजिक बांधलकी जपण्यासाठी ॲगीओ फार्मा कंपनीने घेतलाला पुढाकार कौतुकास्पद आहे.
तसेच, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी प्रशासनाला आतापर्यंत सहकार्य केले आहे. यापुढील काळातही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button