breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

आज मुंबई आणि उपगनरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार;पावसाच्या जोरदार सरी बरसणार

काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर 2-3 दिवस पावसाने विश्रांती घेतली असली तरी अधून मधून पावसाच्सया हलक्या सरी सुरुच आहे. आज म्हणजे 10 ऑगस्टला मुंबई आणि उपगनरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून अधून मधून पावसाच्या जोरदार सरी बरसतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर मागील 24 तासांत मुंबई हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु झाला. अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

दरम्यान काल राज्यातील नागपुर, चंद्रपुर, भंडारा, वर्धा, गडचिरोली , गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. 11 ऑगस्ट म्हणजेच उद्या पासून राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय होणार असल्याचा अंदाज मुंबई हवामान खात्याने वर्तवला आहे.

मागील आठवड्यात मुंबईत तुफान पाऊस झाला. त्यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. सखल भाग, रस्ते, रेल्वे मार्ग जलमय झाले होते. पत्रे उडणे, घरात पाणी शिरणे या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत होते. वृक्ष उन्मळून पडणे, भिंत कोसळणे यामुळे वाहतुकीचा खोळंबाही झाला होता. मात्र 2-3 दिवस सातत्याने सुरु असलेली पर्जन्यवृष्टी थांबली आणि विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येऊ लागले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button