breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

ड्वेन ब्राव्होने दुसऱ्यांदा केली निवृत्तीची घोषणा

दुबई – वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर स्वत: ब्राव्होने याबद्दल माहिती दिली. कॅरेबियनचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने समालोचक ऍलेक्स जॉर्डन यांच्याशी फेसबुक लाइव्ह केले. यावेळी संवाद साधताना ब्राव्हो म्हणाला की, ‘आता निर्णयाची अंतिम वेळ आली आहे. माझ्या मते निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे.’

यापूर्वी 2018 मध्ये ब्राव्होने निवृत्तीची घोषणा केली होती. परंतु 2019 मध्ये यू-टर्न घेत तो पुन्हा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. वेस्ट इंडीज संघात स्थान मिळत नसल्याच्या नाराजीवरून ब्रावोने निवृत्तीची घोषणा केली होती. 26 ऑक्टोबर 2018 रोजी त्याने क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्यानंतर तो वेगवेगळ्या देशातील व्यावसायिक लीगमध्ये खेळताना दिसला. जर वर्ल्ड कपसाठी संघात स्थान मिळाले तर पुन्हा खेळू असे त्याने म्हटले होते आणि त्यानुसार तो पुन्हा खेळतानाही पाहायला मिळाला.

यंदा टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर दोन टी-20 वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या वेस्ट इंडीज संघाच्या सेमीफायनलच्या आशा संपुष्टात आल्या. या सामन्यानंतर ड्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीला पूर्णविराम देणार असल्याचे सांगितले. ’18 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक चढ-उताराचा सामना केला. ज्यावेळी मागे वळून पाहतो त्यावेळी वेस्ट इंडीज संघासाठी मोलाचे योगदान दिल्याचे समाधान वाटते’, असे ब्राव्होने सांगितले. तसेच ‘मैदानातील कामगिरीच्या जोरावर या कालावधीत जागतिक स्तरावर स्वत:ला सिद्ध करु शकलो, याचा अभिमान वाटतो’, असेही तो म्हणाला. दरम्यान, ड्वेन ब्राव्हो आतापर्यंत वेस्ट इंडिजकडून 90 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे, ज्यात त्याने 1245 धावा केल्या आहेत आणि 78 विकेट्स घेतल्या आहेत. 2004 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ब्राव्होने आतापर्यंत वेस्ट इंडिजसाठी एकूण 293 सामने खेळले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button