breaking-newsताज्या घडामोडी

एक हजार शिवप्रेमी करणार चंद्रभागा अन् भुईकोट किल्ल्याची स्वच्छता

सोलापूर | महाईन्यूज

अखंड राजा शिवछत्रपती परिवाराकडून सोलापुरातील भुईकोट किल्ल्याची स्वच्छता करण्यात येणार आहे़ एक मार्च रोजी सकाळी आठ वाजता भुईकोट किल्ल्याची स्वच्छता करण्यात येईल़ त्यापूर्वी २९ फेब्रुवारी रोजी सकाळी पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची स्वच्छता करण्यात येणार आहे़ या मोहिमेत राज्यभरातील एक हजार गडप्रेमी, शिवप्रेमी सहभागी होणार आहेत़ या स्वच्छता मोहिमेत सोलापूरकरांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अखंड राजा शिवछत्रपती परिवाराचे अध्यक्ष आशिष घोरपडे यांनी केले आहे.

अखंड राजा शिवछत्रपती परिवार मागील साडेपाच वर्षांपासून महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांत दुर्ग स्वच्छता मोहीम राबवत आहे़ २९ फेब्रुवारीला परिवारातील कार्यकर्त्यांचे पंढरपूर येथे आगमन होणार आहे़ शनिवार, दि़ २९ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता चंद्रभागा नदी स्वच्छता मोहिमेला सुरुवात होणार आहे़ दोन तास स्वच्छता मोहीम झाल्यानंतर पंढरपूर शहरातून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे़ स्वच्छता आणि वृक्षारोपण आणि गडकिल्ल्याच्या संवर्धनाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे़ दुपारी तीन वाजता पंढरपुरातील वीरपत्नी आणि वीरमातांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती आशिष घोरपडे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button