breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

एका दिवसात मुकेश अंबानींचे झाले ‘४४,०००’कोटींचे नुकसान

मुंबई | आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचं आज (सोमवार) जवळपास ४४,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यांची प्रमुख कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर हे तब्बल १३ टक्क्यांनी घसरले आहे. ही मागील १२ वर्षातील रिलायन्सच्या शेअर्समधील सर्वात मोठी घसरण आहे.

फोर्ब्सच्या रिअलटाइम निव्वळ संपत्तीनुसार, मुकेश अंबानींची निविवळ संपत्ती ४१.८ अब्ज डॉलर्स एवढी होती. ज्यामध्ये सोमवारी १२.४० टक्क्यांची घट झाली. त्यामुळे अवघ्या एका दिवसात त्यांची संपत्ती ५.९ अब्ज डॉलरने कमी झाली आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये ३० टक्क्यांहून जास्त कपात झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी घसरण दिसून आली. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीवरून सध्या सुरु असलेल्या स्पर्धेमुळे सोमवारी तेलाच्या किंमती या ३० टक्क्यांहून अधिक खाली आल्या. १९९१ नंतरची कच्चा तेलाच्या किंमतीतील ही सर्वात मोठी घसरण आहे.

तेल उत्पादक देशांमध्ये उत्पादनाविषयी सहमती होऊ न शकल्याने प्रमुख तेल निर्यातदार सौदी अरेबियाने किंमत प्रचंड कपात करत असल्याची घोषणा केली. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, क्रूडच्या किंमतीत घट झाल्यामुळे RILच्या नफ्यावर थेट परिणाम होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button