breaking-newsराष्ट्रिय

नीरव मोदी कॅमेऱ्यात दिसला म्हणजे लगेच भारतात आणू शकतो असं नाही – परराष्ट्र मंत्रालय

पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला नीरव मोदी कॅमेऱ्यात कैद झाला असल्याने पुन्हा एकदा त्याच्या प्रत्यार्पणाची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने नीरव मोदीला भारतात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरु असल्याची माहिती दिली आहे. नीरव मोदी लंडनमध्ये असल्याची आधीच कल्पना आहे. तो तिथे असल्याची माहिती असल्यानेच प्रत्यार्पणाची विनंती केली होती. त्यामुळे आता तो कॅमेऱ्यात दिसला म्हणून लगेचच त्याला भारतात आणू शकतो असं होत नाही असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘विजय मल्ल्याला आणण्यासाठी जितका प्रयत्न करत आहोत तितकाच प्रयत्न नीरव मोदीला आणण्यासाठी केला जात आहे. प्रत्यार्पणासाठी गरज असणारी सर्व कागदपत्रं बिटन सरकारकडे सोपवण्यात आली असून त्यांनी कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केलेली नाही. त्यामुळे सध्या आम्ही फक्त त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत’.

ANI

@ANI

Raveesh Kumar,MEA: All necessary steps are being taken for the extradition of Nirav Modi. We have been aware of his presence in UK. It(extradition request) is under their(UK Govt) consideration

136 people are talking about this

पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला आरोपी नीरव मोदी लंडनमध्ये असून एकदम ऐशो आरामात जगत आहे. वेस्ट एंड येथील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये नीरव मोदी वास्तव्य करत आहे. द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, नीरव मोदीने लंडनमध्ये हिऱ्यांचा नवा व्यवसाय सुरु केला आहे. नीरव मोदीला आम्ही शोधले असून तो वेस्ट एन्ड लंडनमध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचेही टेलिग्राफने म्हटले आहे. नीरव मोदीचा व्हिडीओही यासोबत जारी करण्यात आला असून अत्यंत बिनधास्तपणे लंडनमधील रस्त्यांवर फिरताना दिसत आहे.

व्हिडीओत नीरव मोदीने एक जॅकेट घातलेलं दिसत आहे. या जॅकेटची किंमत कमीत कमी दहा हजार पाऊंड म्हणजेत नऊ लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. जवळपास दोन मिनिटांच्या व्हिडीओत पत्रकार वारंवार नीरव मोदीला प्रश्न विचारत त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांसंबंधी विचारणा करत आहे. मात्र नीरव मोदी कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नाही. दरवेळी नीरव मोदी ‘नो कमेंट्स’ इतकीच प्रतीक्रिया देतो.

भारतीय बँकिंग क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या घोटाळ्याचा (१३ हजार कोटी) सुत्रधार असलेला नीरव मोदी गेल्या वर्षी भारतातून फरार झाला आहे. भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी हरऐक प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नातूनच इंटरपोलने गेल्या वर्षी जुलै महिन्यांत त्याच्या नावे रेड कॉर्नर नोटीसही काढली आहे. मात्र, अद्याप नीरव मोदी कोणाच्याही हाती लागलेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button