breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्याने, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मुंबई | महाईन्यूज
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. डोंबिवली-ठाकुर्ली स्थानकांदरम्यान एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक जवळपास अर्धा तास उशिराने चालू आहे. पाटणा एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्यामुळे जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आलेली आहे. कल्याणहून मुंबईकडे येणारी वाहतूक धीम्या मार्गावर वळवली आहे. इंजिनमधील बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र यामुळे अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झालेली आहे.