breaking-newsआंतरराष्टीय

एअर फोर्सची नजर बंकर, इमारत उद्धवस्त करणाऱ्या ‘स्पाइस-२०००’ बॉम्बवर

बालाकोटमधील जैश ए मोहोम्मदच्या तळावर एअर स्ट्राइकसाठी भारतीय हवाई दलाने ‘स्पाइस-२००० बॉम्ब’चा वापर केला होता. या बॉम्बनी अत्यंत अचूकतेने लक्ष्यभेद केला होता. आता भारतीय वायूसेना आपल्या भात्यात त्यापेक्षाही शक्तीशाली स्पाइस २००० बॉम्बच्या अत्याधुनिक आवृत्तीचा समावेश करण्याचा विचार करत आहे.

या बॉम्बमध्ये संपूर्ण इमारत किंवा एखादे बंकर पूर्णपणे उद्धवस्त करण्याची क्षमता आहे. बालाकोटच्या कारवाईदरम्यान हवाई दलाच्या १२ ‘मिराज-२०००’ लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा (एलओसी) पार करून जैशच्या तळावर बॉम्ब टाकले होते. भारताने या कारवाईच्यावेळी वापरलेले स्पाइस बॉम्ब इमारतीचे छत भेदून आतमध्ये गेल्यानंतर स्फोट झाला होता. हे बॉम्ब इमारतीच्या छतावर छिद्र करुन आतमध्ये घुसले होते. या बॉम्बने संपूर्ण इमारत पाडली नाही पण आतामध्ये झालेल्या स्फोटामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले.

भारतीय वायूसेना आता ‘स्पाइस – २००० बॉम्ब’ ची अत्याधुनिक आवृती ‘मार्क ८४’ वॉरहेड असलेलल्या बॉम्बचा आपल्या भात्यात समावेश करण्याचे नियोजन करत असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी एएनआयला दिली आहे.

आपतकालीन परिस्थितीत शत्रूला तोंड देण्याची आपली तयारी असावी यासाठी, तिन्ही सैन्य दलास त्यांच्या निवडीची ३०० कोटी रुपयांपर्यंतची साधनसामुग्री खरेदीच्या देण्यात आलेल्या विशेष अधिकारांर्तगत, ही खरेदी केली जाणार असल्याची शक्यता आहे. या विशेष अधिकारातर्गत, भारतीय लष्कराने शत्रूच्या कुठल्याही संकटाला सडेतोड उत्तर देण्यासाठी, या अगोदरच स्पाइक रणगाडा भेदी क्षेपणास्त्र खरेदी करण्याचे ठरवलेले आहे. भारताने स्पाइस – २००० बॉम्बची खरेदी इस्राइलकडून केली आहे.

काय आहे स्पाइस २००० बॉम्ब
भारताने बालाकोटमध्ये शत्रूच्या तळावर हल्ला करण्यासाठी स्पाइस २००० अस्त्राचा वापर केला. स्पाइस २००० हा स्मार्ट बॉम्ब असून अत्यंत अचूकतेने लक्ष्याचा वेध घेण्यासाठी या बॉम्बचा वापर केला जातो. स्पाइस २००० ला बॉम्ब म्हटले जात असले तरी हा एक ‘गायडन्स किट’ आहे. म्हणजे ज्याला मार्गदर्शक म्हणता येईल. पारंपरिक वॉरहेड किंवा बॉम्ब जो असतो त्याला स्पाइस २००० किट जोडले जाते. त्यामुळे २६ फेब्रुवारीला एअर स्ट्राइकच्यावेळी जो बॉम्ब वापरला गेला तो स्वदेशी बनावटीचा असावा. त्याची निर्मिती भारतातील दारुगोळा कारखान्यामध्ये झाली असावी. या स्पाइस किटची निर्मिती इस्त्रायलमधल्या कंपनीने केली आहे. या किटमध्ये कॅमेरा, मेमरी चीप आणि जीपीएस असते. ज्याच्या मदतीने लक्ष्यावर अचूक प्रहार करता येतो. एकदा लक्ष्य निश्चित झाले की, या स्मार्ट किटच्या मेमरी चीपमध्ये सर्व माहिती सेट केली जाते. टार्गेटचे जीपीएस लोकेशन, उपग्रहामार्फत घेतलेले फोटो, लक्ष्याच्या आसपास काय आहे त्याची माहिती मेमरी चीपमध्ये सेट केली जाते. पारंपारिक बॉम्बला हे स्मार्ट किट जोडले जाते. फक्त अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी बॉम्बसोबत हे स्मार्ट किट वापरले जाते. या तंत्राच्या मदतीने काही किलोमीटर अंतरावरुन हवाई दलाला अचूक हल्ला करता येतो. त्यामुळे एअर स्ट्राइकमध्ये टार्गेट मिस होण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. त्यामुळेच पाकिस्तानने घटनास्थळी दीडमहिना कोणाला जाऊ दिले नाही. उलट भारतीय हवाई दलाने जंगलात इतक्या आतमध्ये असलेल्या भागात लक्ष्यावर अचूक प्रहार करुन आपली क्षमता दाखवून दिली. दहशतवाद्यांना तुम्ही आमच्यापासून लपवू शकत नाही हेच भारताने आपल्या कारवाईतून सिद्ध केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button