breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मुलीशी प्रेमसंबंध ठेवल्याप्रकरणी मुलाला घरी बोलावून पेटवले

पुणे – मुलीशी प्रेमसंबंध ठेवले म्हणून एका १९ वर्षीय तरुणाला घरी बाेलवून त्याच्या अंगावर राॅकेल आणि पेट्राेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील इंदापुरमध्ये उघडकीस आला आहे.

यात किस्मत शब्बीर शेख (नरसिंगपूर, ता. इंदापूर) नामक तरुण गंभीररीत्या भाजला असून त्याच्यावर सध्या सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संताेष घाेरपडेसह तीन जणांविरोधात इंदापूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किस्मत शेख हा चिकन विक्रेता असून त्याचे नरसिंगपूर येथील गावातीलच एका मुलीसोबत मागील काही दिवसांपासून प्रेमसंबंध हाेते. ही बाब मुलीच्या कुटुंबीयांना समजली. त्यावरुन त्यांनी मुलीला जाब विचारत मारहाणही केली.

मात्र, त्यांचा मुलावर राग होता. त्यामुळे संताेष घाेरपडेने किस्मत शेखला ३ मे राेजी रात्री १० वाजेच्या सुमारास घरी बोलावून घेतले. ‘तू आमच्या मुलीचा नाद साेड’ असे म्हणत शिवीगाळ केली. दरम्यान, घाेरपडे व त्याच्या साथीदारांनी किस्मतच्या अंगावर राॅकेल व पेट्राेल आेतून काडी पेटीने पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत किस्मत गंभीररीत्या भाजला असून त्याला स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, त्यास पुढील उपचाराची गरज असल्याने साेलापूर येथे हलवण्यात आले. याबाबत साेलापूर बाजार पाेलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करून घेत ताे इंदापूर पाेलिसांकडे पुढील तपासाकरिता वर्ग केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button