breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

एअरटेलचा नवीन ४९९ रुपयांचा प्लान, रोज ३ जीबी डेटासह खास सुविधा

नवी दिल्ली- एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन फर्स्ट रिचार्ज (FRC) प्लान आणला आहे. फर्स्ट रिचार्ज प्लानचा वापर तेच ग्राहक करू शकणार आहे. जे ग्राहक पहिल्यांदा सिमवर रिचार्ज करतात. एअरटेल आपल्या नवीन ग्राहकांसाठी या प्रकारची ५ नवीन प्लान ऑफर करते. कंपनीने एक नवीन फर्स्ट रिचार्ज प्लान आणले आहे. यात एका वर्षापर्यंत डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे सब्सक्रिप्शन मिळते. याची किंमत ४९९ रुपये आहे.

एअरटेलच्या ४९९ च्या एफआरसी प्लानमध्ये काय आहे
हा प्लान कंपनीचा लेटेस्ट FRC प्लान आहे. हा एकमेव असा फर्स्ट रिचार्ज प्लान आहे. ज्यात डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे एक वर्षासाठी बेनिफिट मिळणार आहे. प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. ज्यात नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसोबत रोज ३ जीबी डेटा आणि 100 SMS मिळतात.

आणखी चार प्लान
४९९ रुपयांच्या प्लानशिवाय १९७ रुपये, २९७ रुपये, ४९७ रुपये आणि ६४७ रुपये असे चार अन्य फर्स्ट रिचार्ज प्लान ऑफर करते. १९७ रुपयांत २८ दिवसांची वैधता मिळते. यात अनलिमिटेड कॉलिंग सोबत एकूण २ जीबी डेटा आणि ३०० एसएमएस मिळते. २९७ रुपयांच्या प्लानमध्ये सुद्धा अनलिमिटेड कॉलिंग सोबत २८ दिवसांची वैधता मिळते, परंतु, यात रोज १.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएस रोज मिळतात.

४९७ रुपयांच्या प्लानमध्ये सुविधा एकदम २९७ रुपयांच्या प्लानसारख्या आहेत. यात दुप्पट वैधता मिळते. ५६ दिवसांची वैधतेसोबत रोज १.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग ऑफर केली जाते. सर्वात महाग प्लान हा ६९७ रुपयांचा एफआरसी प्ला आहे. यात ८४ दिवसांची वैधता मिळते. यात अनलिमिटेड कॉलिंग, रोज १.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button