breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राहुल गांधींनी केले स्वागत!

नवी दिल्ली – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी बुधवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिला यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी संजय निरुपम देखील उपस्थित होते.

नवी दिल्लीत रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.  उत्तर मुंबई लोकसभा भाजपाकडून या आधीच गोपाळ शेट्टी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आता काँग्रेस उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा करत असल्य़ाचं सांगण्यात येत आहे. उर्मिला मातोंडकर यांचा काॅग्रेस प्रवेश करून तिकीट देण्यासाठी काॅग्रेस पक्षाच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचंही सांगण्यात येत आहे. पण याच मतदार संघातून आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारी कोणाला याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

https://twitter.com/ANI/status/1110824267942379521

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button