breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाल्याला एनसीबीकडून अटक

मुंबई – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)कडून सुरू असलेल्या बॉलिवूड ड्रग्स तपासात आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी आणि त्यांच्या संबंधितांची नावे समोर आली आहेत. त्यानंतर आता एनसीबीकडून या प्रकरणात आणखी एक अटक झाली आहे. मुंबईतील प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’ दुकानाच्या मालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जयशंकर तिवारीला ‘मुच्छड पानवाला’ या नावाने ओळखले जाते. ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानंतर एनसीबीकडून सोमवारी त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सोमवारी रात्री त्याला अटक करण्यात आले.

‘मुच्छड पानवाला’ हा मुंबई आणि देशातील प्रसिद्ध पानवाल्यांपैकी एक आहे. १९७०पासून केम्स कॉर्नर परिसरात त्याचे दुकान असून दरवर्षी त्याच्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. अनेक हायप्रोफाइल उद्योजक, सेलिब्रिटी तसेच क्रिकेटर त्याचे ग्राहक आहेत. हा पानवाला महागड्या मर्सिडीज कारमधून फिरतो. २०१६मध्ये त्याने ग्राहकांकडून ऑनलाईन ऑर्डर घेण्यासाठी वेबसाईटदेखील सुरू केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीकडून ड्रग्ज प्रकरणात ब्रिटीश नागरिक असलेल्या करण सजनानीच्या अटकेनंतर झालेल्या चौकशीत मुच्छड पानवाल्याचे नाव समोर आले होते. खारमध्ये राहणारा हा ब्रिटीश नागरिक आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे. एनसीबीने वांद्रे येथून करण सजनानी आणि बॉलिवूड अभिनेत्रीची पूर्व मॅनेजर राहिला फर्निचरवाला यांना गांजासह अटक केली होती. यावेळी करण सजनानी याच्याकडून मुच्छड पानवाल्याला गांजा पुरवला जात होता, अशी माहिती चौकशीतून समोर आली. तर राहिला फर्निचरवालासुद्धा मदत करत होती असे एनसीबीचे म्हणणे आहे. यानंतर एनसीबीकडून सोमवारी मुच्छड पानवाल्याची चौकशी करण्यात आली आणि नंतर अटकेची कारवाई झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button