breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उपमहापौरांच्या मागणीनुसार देहूरोड धम्मभूमीच्या वर्धापन दिनानिमित्त ‘पीएमपीएमएल’तर्फे बस सुविधा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1954 रोजी देहूरोड येथे भगवान गौतम बुद्धांची मूर्ती देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमी येथे स्थापना करून बौध्द धम्माच्या पुर्नस्थापनेची क्रांती केली.

या ऐतिहासिक धम्मभूमीचा येत्या दि. 25 डिसेंबरला 65 वा वर्धापन दिन आहे. या कार्यक्रमात एक लाख बौध्द अनुयायांच्या महावंदनेकरिता राज्यभरातील लाखो अनुयायी सहभागी होणार आहेत. त्यांच्यासाठी या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पिंपरी चौक ते धम्मभूमी, देहूरोड अशी बससेवा पुरविणेबाबत, उपमहापौर तुषार हिंगे यांनी पीएमपीएमएलकडे मागणी केली होती.

तरी, उपमहापौर हिंगे यांच्या मागणीनुसार पीएमपीएमएलतर्फे दि. 25 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पिंपरी चौक ते धम्मभूमी, देहूरोड अशी बससेवा पुरविण्यात येणार आहे, तरी त्यांचा लाभ जास्तीत-जास्त अनुयायींनी घ्यावा, असे आवाहन उपमहापौर तुषार हिंगे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button