breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विद्यार्थ्यांसाठी सांगवी ते चांदखेड ‘पीएमपीएमएल’ बस सेवा सुरू, महापौरांच्या हस्ते शुभारंभ

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

चांदखेड परिसरातील विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमध्ये येण्याजाण्याची सोय नसल्यामुळे  शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी चांदखेड ते सांगवी पीएमपीएमएल बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

सांगवी ते चांदखेड बस मार्गाचे उदघाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते चांदखेड येथे नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य संतोष ढोरे, सरपंच अमोल कांबळे, उपसरपंच वर्षा गायकवाड, माजी उपसरपंच पौरस बारमुख, रमेश गायकवाड (मा.अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस युवक, मावळ), संदीप आगळे (अध्यक्ष तंटा मुक्ती समिती), मुख्याध्यापक ए. एन. ओगले, वसंत गायकवाड, रामहरी गायकवाड, अनिल दाभाडे, बजरंग राजीवडे, वसंत काटे,  रविंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. 

महापौर ढोरे म्हणाल्या की, चांदखेड परिसरातील विद्यार्थी सांगवी व पुणे शहरात शिक्षण घेण्यासाठी येतात. परंतु, वाहतुकीची सोय नसल्यामुळे मुली अर्ध्यातुन शिक्षण सोडून देत असल्याचे निदर्शनास आले. गावक-यांनी थेट बसची मागणी करताच त्यास त्वरित मंजुरी देऊन पीएमपीएमएल बस सेवा सुरू केली. बसमध्ये मुलीची छेडछाड असे प्रकार होऊ नये, यासाठी बसचालक वाहकाने काळजी घ्यावी. गरज पडल्यास सुरक्षा यंत्रणांना त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले.

न्यू इंग्लिश स्कूल, चांदखेड या विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एन.ओगले यांच्या हस्ते महापौर माई ढोरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  एस. ए. पवार यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button