breaking-newsपिंपरी / चिंचवड

राहण्यायोग्य शहर सर्व्हेक्षण प्रचारात ‘एलईडी’ मोबाईल व्हॅन सक्रीय

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालयाच्या वतीने पिंपरी-चिंचवडमध्ये राहणीमान सर्व्हेक्षण सुरू आहे. या अभियानाची जनजागृती करण्यासाठी महापालिकेने एलईडी मोबाईल व्हॅन सक्रिय केली आहे. त्याचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते काल सोमवारी (दि. 17) सायंकाळी करण्यात आले.

पिंपरी-चिंचवडमध्ये 1 ते २९ फेब्रुवारी दरम्यान हे सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी तीन निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये राहण्यास योग्य शहर, महापालिकेचे कामकाज व शहराचे हवामान याबाबत नागरिकांची मते जाणून घेतली जात आहेत. शहराचा क्रमांक निश्चित करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामध्ये पिंपरी-चिंचवड बरोबर देशातील ११४ व राज्यातील १२ शहरांचा सहभाग आहे. आपल्या शहराला त्यामध्ये अव्वल स्थानांकन प्राप्त व्हावे, याकरिता नागरिकांनी मोठया प्रमाणावर सहभागी व्हावे, यासाठी एलईडी मोबाईल व्हॅन म्हणजेच राहण्यायोग्य शहर सर्व्हेक्षण रथाव्दारे करण्यात येणार आहे.

काल संध्यासाळी महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास माजी महापौर राहूल जाधव, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, माधुरी कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button