TOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

भाजपा खासदार निशिकांत दुबे, मनोज तिवारींसह ७ जणांवर गुन्हा दाखल; काय आहे नेमकं प्रकरण, घ्या जाणून

भाजपा खासदार निशिकांत दुबे, मनोज तिवारींसह ७ जणांवर झारखंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. देवघर विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) इमारतीत जबरदस्तीनं घुसून विमानाच्या उड्डाणाची परवानगी घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हे सर्वजण ३१ ऑगस्ट रोजी पेट्रोल हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अंकिताच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी दुमका येथे पोहोचले होते. परतीच्या वेळी हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

अधिकाऱ्यांकडून बळजबरीनं घेतली परवानगी

खासदार निशिकांत दुबे, मनोज तिवारी आणि कपिल मिश्रा यांच्यासह आणखी काही जण पेट्रोल हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अंकिताच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी दुमका इथं आले होते. यावेळी निशिकांत दुबे यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुलंही होती. दुमका येथून आल्यानंतर खासदार पुन्हा गावी जाण्यासाठी साडेपाच वाजता विमानतळावर पोहोचले आणि चार्टर विमानात बसले. यावेळी देवघर विमानतळ एटीसीनं विमानाला परवानगी दिली नाही. त्यामुळे खासदार दुबे, त्यांची दोन मुलं, मनोज तिवारी, सुनील तिवारी यांच्यासह सगळे जण एटीसी इमारतीत घुसले आणि अधिकार्‍यांकडून बळजबरीनं मंजुरी घेऊन दिल्लीला रवाना झाल्याचा आरोप आहे.

सुरक्षा प्रभारी सुमन आनंद यांच्या तक्रारीवरून १ सप्टेंबर रोजी कुंडा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘या व्यक्तींनी एटीसी कार्यालयात घुसून सुरक्षा नियमांचं उल्लंघन केलं आणि उड्डाणाच्या परवानगीसाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला. कुंडा पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारीनंतर निशिकांत दुबे, मनोज तिवारी आणि विमानतळ संचालकांसह नऊ जणांवर आयपीसी कलम ३३६ (इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारं कृत्य), ४४७-४४८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button