breaking-newsराष्ट्रिय

शरद यादव यांना वेतन काढण्यास मनाई

  • सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा 

नवी दिल्ली – जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव हे खासदाराला मिळणारे वेतन आणि भत्ते काढू शकत नाहीत, असा निर्वाळा आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. यादव यांना याआधीच खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे.
राज्यसभेचे खासदार म्हणून अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला यादव यांनी आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवरील निर्णय प्रलंबित असेपर्यंत त्यांना वेतन आणि भत्ते काढण्याची परवानगी दिल्ली उच्च न्यायालयाने दिली होती. मात्र, त्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने बदल केला.

अर्थात, सरकारी निवासस्थान कायम ठेवण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजद, कॉंग्रेसबरोबरची महाआघाडी तोडून भाजपशी युती केली. तो निर्णय न रूचल्याने शरद यादव यांनी बंडाचे निशाण फडकावले. जेडीयूमधील अंतर्गत संघर्षाच्या परिणामी यादव यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले. आता यादव यांच्या समर्थकांनी स्वतंत्र लोकतांत्रिक जनता दलाची (लोजद) स्थापना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा यादव यांच्यासाठी हादरा मानला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button