breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

उदयनराजे विरोधात मैदानात उतरणार, त्यांनी जनतेसाठी काय केले, अभिजित बिचकुलेचा सवाल

उदयनराजेंनी, भाजप प्रवेश करायला नको होता, त्यांनी खासदारकी न सोडता जनतेसाठी काम करायला हवे होते, बिचकुलेंचा सल्ला

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले याने आता उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. उदयनराजेंनी खासदारकी न सोडता जनतेसाठी काम करायला हवे होते, असाही सल्ला बिचकुलेनी यांनी दिला आहे.

अखिल बहुजन समाज सेनेचे नेते अभिजीत बिचकुले याने आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी 288 जागांवर निवडणूक लढणार अशी घोषणा केली.

तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेब यांना निवडणुकीत आव्हान देणे हे भल्याभल्यांना जमले नाही. पण साहेब जर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उभे राहिले तर त्यांच्याविरोधात उभं राहणे हे माझ्यासाठी गौरवास्पद राहील, अशी घोषणाच अभिजीत बिचकुलेनं केली.

अखिल बहुजन पक्ष हा 288 विधानसभेच्या राज्यातील जागा लढवणार असून बिग बाॅसच्या माध्यमातून मी घराघरात पोहचलो आहे. तसंच मी आजपर्यंत वंचितासाठी काम केले असून नागरिक आमच्या पक्षाला न्याय देतील, असा विश्वासही त्यानी बोलून दाखवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button