breaking-newsमनोरंजन

रिया चक्रवर्तीविरोधात बिहारमध्ये याचिका दाखल

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड, टीव्ही सेलिब्रिटी सुशांतबाबत पोस्ट करत आहेत. वयाच्या केवळ 34व्या वर्षी सुशांतने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. त्याने असं नेमकं का केलं, हाच प्रश्न अनेकांना पडला आहे. आज सुशांतच्या आत्महत्येला एक आठवड्याहून अधिक काळ झाला आहे. पण अजूनही त्याच्या आत्महत्येचं गूढ कायम आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलीस त्याचे मित्र, नोकर, नातेवाईक यांच्यासह सुशांतसोबत काम केलेले लोक आणि प्रोडक्शन हाऊसेसची चौकशी करत आहेत. मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री आणि सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीचीही गुरुवारी जवळपास 11 तास चौकशी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या मुजफ्फरपुरमधील न्यायालयात सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी शनिवारी याचिका दाखल केली गेली आहे. या याचिकेत रिया चक्रवर्तीवर आत्महत्येचा आरोप करण्यात आला आहे. मुझफ्फरपूरमधील पताही भागातील रहिवासी कुंदन कुमार यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी मुकेश कुमार यांच्यासमोर ही याचिका दाखल केली असून त्यावर 24 जून रोजी सुनावणी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button