उत्सवामूळे पोलिसांचा पिंपरीतून रुटमार्ट
पिंपरी ( महा ई न्यूज ) – गणेश उत्सव तीन दिवसात समाप्त होत आहे. त्यामुळे शहरात सर्वच गणेश मंडळे गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढतात. विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि परिमंडळ दोनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी आज (गुरुवारी) शहरातून रूटमार्च केला.
पोलिसांच्या रूटमार्चमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हा रूटमार्च दुपारी चार वाजता पिंपरी मधील शगुण चौक येथून करण्यात आला. यामध्ये एक सहाय्यक पोलीस आयुक्त, तीन पोलीस निरीक्षक, 10 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 91 पोलीस कर्मचारी आणि एक एसआरपीएफ प्लाटून हजर होते.