breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिक्षण हा व्यवसाय, धंदा किंवा उदरनिर्वाहाचे साधन नव्हे – पालकमंत्री गिरीष बापट

पिंपरी ( महा ई न्यूज ) – शिक्षण हा व्यवसाय, धंदा किंवा उदरनिर्वाहाचे साधन नाही. तर शिक्षण हा पेशा आहे. शिक्षकांच्या कामातून हजारो विद्यार्थी घडतात. त्यामुळे शिक्षणात सम्राट शब्द वापरण्याची संकल्पना अतिशय चुकीचे आहे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गुणवंत शिक्षक व आदर्श शाळा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आज (गुरुवारी) झालेल्या कार्यक्रमाला महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सभागृह नेते एकनाथ पवार, शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, उपसभापती शर्मिला बाबर, सदस्या विनया तापकीर, अश्विनी चिंचवडे, उषा काळे, राजू बनसोडे, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे, सुवर्णा बर्डे, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे उपस्थित होत्या.

बापट म्हणाले की, ‘शिक्षणातून मानसाला विद्या मिळते. विद्येतून संस्कार होतात. संस्कारातून तो सुसंस्कृत होते आणि अशा सुंस्कृत लोकातून समाजाची संस्कृती निर्माण होते. भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर सगळ्यात चांगली संस्कृती आहे. त्याचे मूळ शिक्षकांपर्यंत जाते. शिक्षकांमुळेच संस्कृती वाढते, हे नम्रपणे मान्य करणे गरजेचे आहे तसेच ‘माणसाचे पगारावर मुल्यपान ठरत नाही. शिक्षणावर त्याचे मुल्यमापन ठरविले जाते. शिक्षणाला सरकारने प्राधान्य दिले असून राज्य सरकार शिक्षणावर सर्वांत जास्त म्हणजेच 42 हजार कोटी रुपये खर्च करत होते. आता त्यामध्ये वाढ केली असून 50 कोटी खर्च केला आहे’. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी केले. प्रास्ताविकपर मनोगत सभापती सोनाली गव्हाणे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button