breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

इंद्रायणीनगरमधील नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी ‘महाशिबिर’

  •  भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांचा पुढाकार
  •  भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे मार्गदर्शन

पिंपरी । प्रतिनिधी

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून अमराई चॅरिटेबल ट्रस्ट व शिवराजदादा लांडगे मित्रपरिवार यांच्या वतीने ‘संकल्प निरोगी आयुष्याचा’ अभियानाअंतर्गत नामांकित रुग्णालयामार्फत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाआरोग्य शिबिरात हृदयरोग,कॅन्सर, किडनी, लिव्हर प्रत्यरोपण यासह इतर अनेक आजारांवर मोफत तपासणीसह मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी दिली.

रविवारी (दि.३) सकाळी १० ते सायंकाळी ४ दरम्यान इंद्रायणी नगर, भोसरी येथील सेक्टर नंबर ७, द्वारका प्लॅटिनम सोसायटी शेजारी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हृदय रोग, किडणी विकार व प्रत्यारोपण, लीव्हर प्रत्यारोपण, गुडघे प्रत्यारोपण, हाडांचे व मणक्याचे आजार, कॅन्सर व शस्त्रक्रिया व केमोथेरेपी, दंतरोग, नेत्ररोग, मोफत श्रवणयंत्रे, मेंदुची शस्त्रक्रिया, आयुर्वेद उपचार, मुत्र मार्गाचा विकार, कान नाक घसा, रक्तदाब, शुगर तपासणी आदी तपासण्या तसेच सर्व आजारांवर आयुष्मान भारत योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यासह लहान मुलांच्या हृदयावरील उपचार, फाटलेले टाळु व ओठांवरील शस्त्रक्रीया, दिव्यांग अपंगासाठी मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

शिबिरात अदित्य बिर्ला हॉस्पिटल, जुपिटर हॉस्पिटल, डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड, साईनाथ हॉस्पिटल, इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल, यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल ( वाय.सी.एम ), निर्विकार आयुर्वेद, कृष्णा ग्रुप देसाई अॅक्सिडेंटल हॉस्पिटल, गुंजकर हॉस्पिटल, रुबी एलकेअर, क्रस्ना डायग्नोस्टिक्स, सिव्हल हॉस्पिटल, ओम हॉस्पिटल आदी नामांकित रुग्णालाये तसेच तज्ञ डॉक्टर सहभागी असणार आहेत. या शिबिराचा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक शिवराज लांडगे यांनी केले आहे.

  • असा घ्या सहभाग?

शिबीर हे पूर्णपणे मोफत असून शहरातील कोणत्याही नागरिकाला याचा लाभ घेता येणार आहे. शिबिरास येताना नागरिकांनी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना किंवा रेशनकार्ड तसेच पूर्वी काही आजार असल्यास त्याची कागदपत्रे आणावीत. तसेच अधिक माहितीसाठी ८८८८४८३८५७ / ८६९८३९२७२७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button