breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

उत्तर प्रदेशप्रमाणे दिल्ली पोलिसही वसूल करणार हिंसा करणाऱ्यांकडून भरपाई

नवी दिल्ली | महाईन्यूज

उत्तर प्रदेश सरकारच्या धरतीवर दिल्ली पोलिसांनी देखील उत्तर-पूर्व दिल्लीतील धार्मिक हिंसेदरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई हिंसा करणाऱ्यांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. या हिंसेत वैयक्तीक आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या योजनेत काम करणाऱ्या पोलिसांनी नाव न छापण्याची अटीवर ही माहिती दिलेली आहे.

गुन्हे अन्वेशन विभाग आणि विशेष तपास यंत्रणा (एसआयटी) तसेच लोकल पोलिसांना या संदर्भात आधीच सूचना मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच नुकसानीची माहिती घेण्यासाठी नगर विकास अधिकारी आणि दिल्ली सरकारसोबत समन्वय साधण्याच्या सूचनाही मिळाल्याचे समजते आहे. उत्तर-पूर्व दिल्लीत मागील चार दिवसांत संपत्तीचं नुकसान करणाऱ्या लोकांची ओळख पटविण्याचे काम एसआयटीकडे सोपविण्यात आले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यासह अनेक स्थानिक गुन्हेगारांनी जाफराबाद, कर्दमपुरी, करावल नगर, मौजपूर, भजनपूर आणि अन्य भागांतील हिंसक घटनांचा फायदा घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button